काळबादेवी ग्रामपंचायत तर्फे श्री गुरु तेज बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष सभेचे आयोजन उत्साहात पार पडले. कार्यक्रमात गुरुजींच्या जीवनकार्य व धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
ग्रामस्थ, मान्यवर व समाजबांधवांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच समाजात ऐक्य, बंधुता आणि शांततेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. 🙏










